Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीपूर्वीच 8 लाख भाविकांनी घेतलं दर्शन | NDTV मराठी

दर्शनबारी आत्ताच सात kilometer वर पोहोचलेली आहे. लाखो वारकरी पंढरीत दाखल झालेले आहेत. विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे आहेत. आठवड्याभरात आठ लाख भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून संकेत आषाढी एकादशी पूर्वीच आठवड्याभरात आठ लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता सुद्धा दर्शन रांग ती सात kilometer पर्यंत पोहोचलेली आहे. काय वातावरण आहे सध्या पंढरी? खर तर पंढरपुरात अतिशय भक्तिमय वातावरण आहे.