लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार (First Voter of Maharashtra) गुजरातमध्ये राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? रेवाता तडवी असं राज्यातील पहिल्या मतदाराचं नाव आहे. त्या नंदुरबार जिल्ह्यातील मणिबोली या गावच्या मूळ रहिवाशी आहेत. लग्नानंतर त्या गुजरातमध्ये राहतात. सरदार सरोवरमध्ये बुडित शेतीसाठी वडिलांच्या पुनर्वसानंतर मिळणाऱ्या रकमेचा दावा कायम रहावा म्हणून राज्यातील पहिला मतदार असण्याचा मान त्यांनी राखून ठेवला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातील पहिल्या क्रमांकाची मतदार म्हणून आजही रेवता तडवी यांच्या नावाची नोंद आहे.