महायुतीत काही आलबेल नसताना दुसरीकडे मवियावर मात्र महायुतीकडून हल्ले सुरूच आहेत. मराठा आरक्षण वाचवण्यात महाविकास आघाडी fail ठरली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी माझ्यावर नेहमी अविश्वास दाखवला असंही ते म्हणाले. त्याचबरोबर मविया सरकार असताना ठाकरेंनी घरात बसून सरकार चालवलं. घरात बसून सरकार चालत नाही असा घणाघातही शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.