संभाजी राजे छत्रपती स्वतः पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत. मुद्दा आहे विशाळगडवरच्या अतिक्रमणांचा. विशाळगडावर असलेली अतिक्रमण काढून टाकण्यात यावी या मागणीसाठी काल संभाजी राजे छत्रपती यांनी आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये दगडफेकही झाली आणि त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले. शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात पोलिसांनी चर्चा करण्यासाठी संभाजी राजे छत्रपती स्वतः दाखल झालेत.