काँग्रेस मुख्यालय टिळक भवन इथे सोमवार आणि मंगळवारी बैठकांचं सत्र आयोजित करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे संघटनात्मक बाबींचा आढावा यातून घेणार आहेत. सोमवारी म्हणजे आजच सर्व जिल्हाध्यक्षांची आणि पंचवीस तारखेला म्हणजे उद्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सगळ्यात आधी प्राधान्य दिलेलं आहे आणि बैठकांचा आयोजन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या आढावा बैठका आहेत. या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाईल तसंच पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.